मनोरंजन

Athiya Shetty KL Rahul: आनंदाची बातमी! अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी हिची लग्नगाठ २३ जानेवारी २०२३ भारतीय संघातील क्रिकेटपटू केएल राहुल याच्यासोबत बांधली गेली. या दोघांचा विवाह सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडला होता. यांच्या लग्नाला आता दोन वर्ष पुर्ण होत आली आहेत आणि असं असताना आता हे जोडपे एक गोड बातमी सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहे. अथियाने ही गुड न्युज तिच्या वाढदिवसाच्या 3 दिवसांनंतर सर्वांपर्यंत पोहचवली आहे.

तर येत्या नववर्षात म्हणजेच 2025 साली यांच्या घरी चिमुकल्याच्या लहान पाऊलांसह आगमन होणार आहे. अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. यादरम्यान त्यांनी केलेल्या या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी आणि चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. मात्र आता हा येणारा नवा पाहूणा कोणत्या महिन्यात आपल्या लहान पाऊलांनी आगमन करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

नुकतेच अनेक सेलेब्रिटीस आणि क्रिडा क्षेत्रातील लोकांनी अशी आनंदाची बातमी दिली आहे. यात आता अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. अथिया २०२५ मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ‘आमचा सर्वात सुंदर आशीर्वाद २०२५ मध्ये येणार आहे,’ असं कॅप्शन देत अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. सोनाक्षी सिन्हा, अहान शेट्टी, शिबानी दांडेकर, क्रिष्णा श्रॉफ यांनी कमेंट्सद्वारे अथिया आणि केएल राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा