Athiya Shetty- KL Rahul  Team Lokshahi
मनोरंजन

Athiya Shetty - KL Rahul : अथिया शेट्टी पुढील तीन महिन्यांत केएल राहुलशी लग्न करू शकते, हे असेल लग्नाचे ठिकाण

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सध्या भारतीय क्रिकेटर केएल राहुलला ( KL Rahul) डेट करत आहे. ती अनेकदा त्याच्यासोबत स्पॉट झाली आहे. अलीकडेच केएल राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया (Athiya Shetty) जर्मनीहून परतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सध्या भारतीय क्रिकेटर केएल राहुलला ( KL Rahul) डेट करत आहे. ती अनेकदा त्याच्यासोबत स्पॉट झाली आहे. अलीकडेच केएल राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया (Athiya Shetty) जर्मनीहून परतली आहे. केएल राहुल ( KL Rahul) पाठीची शस्त्रक्रिया करण्यासाठी परदेशात गेला होता. प्रशिक्षणादरम्यान केएल राहुलच्या पाठीला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आधी केएल राहुल जर्मनीला रवाना झाला होता, नंतर अथियाही (Athiya Shetty) तिच्या बॉयफ्रेंडची काळजी घेण्यासाठी तिथे पोहोचली होती. आता बातमी येत आहे की हे कपल येत्या तीन महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

अथिया आणि राहुल बराच काळ एकमेकांसोबत आहेत. दोघेही नुकतेच त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी गेले होते. लग्नानंतर दोघेही या घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जातंय, घरची कामं जोरात सुरू आहेत. अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल ( KL Rahul) या दोघांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कार्यक्रम असेल. आणि अथिया स्वतः या खास दिवसाला आणखी खास बनवण्याच्या तयारीत आहे. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी ती स्वत:ला तयार करत असल्याचे बोलले जात आहे. अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल ( KL Rahul) यांनी गेल्या वर्षी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.

अलीकडेच केएल राहुलने सोशल मीडियावर एक अपडेट दिले होते की तो लवकरच बरा होत आहे. त्याने लिहिले की, 'सर्वांना नमस्कार... काही आठवडे कठीण गेले पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. लवकरच भेटू'.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा