IIFA Awards  
मनोरंजन

'सरदार उधम सिंह' आणि 'अतरंगी रे' चित्रपटाने पटकावले सर्वात जास्त पुरस्कार

Published by : Akash Kukade

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पुरस्कार सोहळा IIFA (International Indian Film Academy) ने या वर्षीच्या विजेत्यांची घोषणा केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक कलाकारांनी पुरस्कारांच्या रांगेत आपले नाव निश्चित केले आहे.

यावर्षी अभिनेता विक्की कौशलचा चित्रपट 'सरदार उधम सिंह' ने सर्वात जास्त पुरस्कार पटकावले आहेत. 'सरदार उधम सिंह' या चित्रपटाने IIFA मध्ये सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवले आहेत. यावेळीचा हा 22 वा IIFA पुरस्कार सोहळा आहे. ज्याचे आयोजन 20 आणि 21 मे 2022 रोजी अबू धाबीच्या यास आइसलॅंडमध्ये केले जाणार आहे.

IIFA 2022 तांत्रिक पुरस्कारांमधील 'सरदार उधम सिंह' या चित्रपटाला सर्वात जास्त तीन पुरस्कार मिळाले आहेत. तर तापसी पन्नूच्या 'थप्पड' चित्रपटाला चांगल्या डायलॉगसाठी पुरस्कार मिळाले आहे. अभिनेता अजय देवगनच्या 'तान्हाजी' चित्रपटाला साउंड डिजाइनसाठी पुरस्कार मिळाला आणि रणवीर सिंहच्या '83' चित्रपटाला साउंड मिक्सिंगसाठी पुरस्कार मिळाला. सारा अली खान आणि अक्षय कुमारच्या 'अतरंगी रे' चित्रपटाला बॅग्राउंडसाठी आणि कोरियोग्राफीसाठी असे दोन पुरस्कार मिळाले. तसेच 'शेरशाह' चित्रपटाला बेस्ट स्क्रिनप्लेसाठी पुरस्कार मिळाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा