Anek Trailer Team Lokshahi
मनोरंजन

Anek Trailer Out : आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित

आयुष्मान खुरानाचा नव्या चित्रपट 'अनेक'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Published by : Rajshree Shilare

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) त्याच्या चित्रपटांमधून प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येतो. आतापर्यंत आयुष्माननं वेगवेगळ्या भूमिका साकरत हीट चित्रपट दिले आहेत. बऱ्याच काळापासून त्याचा आगामी चित्रपट ‘अनेक’ची (Anek) सोशल मीडियावर चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहूनचं प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये (Trailer) अभिनेता आयुष्मान खुराना गुप्त पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. ‘अनेक’ हा एक पॉलिटिकल अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्मान देशाच्या नॉर्थ ईस्ट भागातील लोकांसोबत होणारा भेदभाव, त्यांच्या दिसण्यावरून त्यांना हिणवलं जाणं आणि देशाची सुरक्षा या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसणार आहे.

Anek movie trailer

ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना शत्रूसोबत लढताना, ॲक्शन करताना दिसत आहे. आयुष्मानच्या दमदार डायलॉग्सनी ट्रेलरमध्ये जीव ओतला आहे. “इंडिया इंडिया इंडिया… मैं इसी इंडिया की सुरक्षा के लिए काम करता हूं नॉर्थ ईस्ट में..” हा त्याचा डायलॉग सर्वांची मनं जिंकून घेतो.

'अनेक' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभव सिन्हा (Abhinav Sinha) यांनी केले आहे. भूषण कुमार (Bhushan kumar) यांच्या टी-सीरीज आणि अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. येत्या २७ मे या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा