ayushmann khurrana Team Lokshahi
मनोरंजन

आयुष्मान आता 3 चित्रपटांत, साकारणार हा रोल

Published by : Akash Kukade

आयुष्मान खुराना (ayushmann khurrana)सामाजिक विषयांवर बनवलेल्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसत असतो. त्याद्वारेच तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. यावर्षी आयुष्मान तीन चित्रपटात मोठ्या पडद्यावर येणार आहे. (bollywood movies)

आयुष्मान खुराना आर्टिकल 15 चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा सोबत ‘अनेक’ या सोशल ड्रामा चित्रपटात लवकरच झळकणार आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा प्रकल्प असून हा एक दमदार चित्रपट आहे कारण तो प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल, असे आयुष्मान म्हणाला.

त्यानंतर अभिनेता अनुभूती कश्यपचा डॉक्टर जी हा चित्रपट येणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आयुष्मान सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. माझा पुढचा चित्रपट डॉक्टर जी हा एक असा विषय आहे, जो लोकांना एका महत्वाच्या सामाजिक समस्येवर मनोरंजक मार्गाने विचार करायला लावेल. असे डॉक्टर जी या चित्रपटाबाबत सांगताना अभिनेता आयुष्मान म्हणाला आहे.

आयुष्मान आनंद एल रायच्या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन हिरोची भूमिका साकारणार आहे. सोबतच हार्डकोर मसाला एंन्टरटेनरमध्ये अभिनेता पाऊल ठेवणार आहे.

आयुष्मान शेवटचा 2021 च्या चंदिगड करे आशिकीमध्ये वाणी कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटाने LGBTQ समुदायाला आदरणीय रीतीने समोर आणले, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय