मनोरंजन

Video : वनवास संपला! अय्यरला सोडून बबिताजीने जेठालालला मारली मिठी

लॉन्गेस्ट टीवी शोपैकी एक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 2008 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून हा शो प्रेक्षकांच्या नेहमीच आवडीचा राहिला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

लॉन्गेस्ट टीवी शोपैकी एक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 2008 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून हा शो प्रेक्षकांच्या नेहमीच आवडीचा राहिला आहे. जेठालाल आणि बबिता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना सर्वाधिक आवडते. पत्नी दयाबेनला विसरून जेठालाल बबिताजींच्या विचारांमध्येच मग्न राहतो. अनेक वर्षांपासून जेठालाल बबिताजींवर लाईन मारत असतो. परंतु, आता अखेर त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्माच्या इंस्टाग्राम हँडलवरुन नव्या एपिसोडचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बबिता जी लॉटरीचे तिकीट जिंकते. बबिता जी इतकी खूश होते की, ती आनंदाने तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सोडून जेठालालला मिठी मारते. यावर जेठालालचा विश्वास बसत नाही. जेठालाल व्हिडीओमध्ये आश्चर्यचकीत होताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये शेवटी स्वप्न पूर्ण झाले. आयुष्यात कधीही हार मानू नका, असे लिहीले आहे.

जेठालालचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहीले की, 14 वर्षांचा वनवास संपला आहे. तर, दुसऱ्याने दिल गार्डन गार्डन हो गया, म्हंटले आहे. आणखी एका युजरने जेठालालला आता मोक्ष मिळेल, अशी कमेंट केली आहे. खरी लॉटरी जेठालाल की लागली आहे, असेही युजरने म्हंटले आहे. दरम्यान, जेठालालची भूमिका प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. तर मुनमुन दत्ता या शोची बबिता जी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार