Babli Bouncer Hindi Movie Team Lokshahi
मनोरंजन

‘बबली बाउन्सर’चा ट्रेलर रिलीज: तमन्नाचा नवीन लूक

मधुर भांडारकर बबली बाउन्सर या चित्रपटातून 5 वर्षांनी पुनरागमन करीत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

Published by : Team Lokshahi

मधुर भांडारकर बबली बाउन्सर या चित्रपटातून 5 वर्षांनी पुनरागमन करीत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना पहिल्यांदाच बॉडीबिल्डरच्या लूकमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटातील ‘मै नाची बिल्लो वेड बनके’ हे गाणे रिलीज करण्यात आले. 2 मिनिटे 22 सेकंदाच्या या गाण्यात जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. या गाण्यात तमन्ना भाटिया स्वतःसाठी मुलगा शोधते आहे. हे गाणे तनिष्क बागची, असीस कौर आणि रोमी यांनी गायले आहे. ज्यामध्ये तमन्ना पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहे. तमन्ना पहिल्यांदाच बॉडीबिल्डरच्या लूकमध्ये दिसणार आहे.

तमन्ना भाटियाचा बबली बाउन्सर हा चित्रपट वुमन एम्पॉवरमेंटवर आधारित आहे. ट्रेलरची सुरुवात आखाड्यामध्ये उभा असलेल्या सौरभ शुक्लाच्या एका लांबलचक संवादाने होते. ज्यात त्याने आपली मुलगी तमन्ना हिचे वर्णन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून केले आहे. तिला मुलांपेक्षा श्रेष्ठ मानले आहे. कुस्तीपटू-बाउन्सर तमन्ना ट्रेलरमध्ये हरियाणवीमध्ये खूप कॉमेडी पंच मारताना दिसत आहे.

या चित्रपटाबाबत तमन्ना म्हणते ‘हे एक पात्र आहे जे मी यापूर्वी कधीही साकारले नाही. साधारणपणे पुरुष हा व्यवसाय निवडतात. अशी असामान्य व्यक्तिरेखा प्रेक्षकांना देताना खूप रोमांचित आहे’.

बबली बाउन्सर 23 सप्टेंबरला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया व्यतिरिक्त बबली बाउन्सरमध्ये साहिल वैद्य, अभिषेक बजाज, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहावे लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा