मनोरंजन

'सिंघम 3'मधील बाजीराव सिंघमचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट

'सिंघम 3' या बहुचर्चित सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिंघम 3' या सिनेमात अजय देवगन मुख्य भूमिकेत असून आता या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Published by : Team Lokshahi

'सिंघम 3' या बहुचर्चित सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिंघम 3' या सिनेमात अजय देवगन मुख्य भूमिकेत असून आता या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अजय देवगनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट लूकची झलक दाखवली आहे. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आता पुन्हा एकदा अजय देवगन चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. अजयने सोशल मीडियावर 'सिंघम 3' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. 'सिंघम 3'च्या पोस्टरमध्ये अजयच्या सिंघम अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये अजयसह सिंहाची झलकही पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करत अजयने लिहिलं आहे,"तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम पुन्हा येतोय".

'सिंघम 3' सिनेमातील अजय देवगनचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते कमेंट्स करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं अभिनेत्याला सांगत आहेत. अजय सर कमाल, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, अजय सर भारी लूक, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य