Tamannaah Bhatia Team Lokshahi
मनोरंजन

Bedroom Scenes: इंटीमेट सीन करताना पुरुष कलाकारांच्या अशा असतात भावना, तमन्ना भाटियाने केला मोठा खुलासा!

तमन्ना भाटियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले आहे. तमन्नाच्या अभिनयापासून ते नृत्यापर्यंत या अभिनेत्रीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व लोकांना आवडते.

Published by : shweta walge

तमन्ना भाटियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले आहे. तमन्नाच्या अभिनयापासून ते नृत्यापर्यंत या अभिनेत्रीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व लोकांना आवडते. अशा परिस्थितीत जेव्हा तमन्ना भाटियाने शूटिंगदरम्यान घडलेल्या इंटिमेट सीनबद्दल काही खुलासे केले आहेत.

अभिनेत्रीने अॅक्शनपासून रोमान्सपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, तमन्नाला सर्व प्रकारच्या सिनेमांमध्ये पसंती मिळाली आहे. आजच्या जमान्यात चित्रपट कोणताही असो, जवळपास प्रत्येक चित्रपटात इंटिमेट सीन्स पाहायला मिळतात. तमन्नाने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा कधी इंटिमेट सीन शूट केले जातात, त्या वेळी पुरुष कलाकारांना कसे वाटते.

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने सांगितले की, हे आवश्यक नाही की पुरुष कलाकार नेहमीच बेडरूम सीन किंवा किसिंग सीनचा आनंद घेतात. अभिनेत्रीने सांगितले की, कधीकधी पुरुष कलाकार तिच्यापेक्षा जास्त नर्वस होतात आणि विचित्र पद्धतीने किसिंग सीन करतात. कलाकारांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की महिला अभिनेत्री त्यांच्याबद्दल काय विचार करेल किंवा सीन कसा असेल. पुरुष कलाकारांच्या भावना जाणून प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटले.

तमन्ना भाटियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तमन्ना तिच्या अभिनयामुळे अनेकांच्या मनावर राज्य करते. तमन्ना भाटियाची एक झलक पाहण्यासाठी अनेक जण मरायला तयार होतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा