Bharti Shingh, Harsh Limbachiya Team Lokshahi
मनोरंजन

भारती सिंहने दाखवली तिच्या बाळाची पहिली झलक

भारतीने हुनरबाजच्या मंचावर तिच्या मुलाची पहिली झळक चाहत्यांना दाखवली

Published by : Team Lokshahi

भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या बाळाचे स्वागत केले आहे. दोघही आजकाल आपल्या मुलासोबत खूप इन्जॉय करत आहेत. भारती सध्या मैटरनिटी रजेवर (maternity leave) आहे तर हर्ष लिंबाचिया हुनरबाज आणि द खतरा खतरा शो होस्ट करत आहे. भारतीने हुनरबाजच्या मंचावर तिच्या मुलाची पहिली झळक चाहत्यांना दाखवली आहे.

वास्तविक भारती सिंहने अलीकडेच व्हिडिओ कॉलद्वारे हुनरबाज शोमध्ये हजेरी लावली होती. या शोचा प्रोमो कलर्सने रिलीज केला आहे. त्या प्रोमोमध्ये भारती तिच्या मुलाला मांडीवर घेऊन आहे आणि त्याच्यासाठी गाणं गात आहे. भारतीच्या बाळाला पाहून सर्वजण त्याच्या क्यूटनेसचे कौतुक करत आहेत.

करण जोहर (Karan Johar) तिच्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च करणार असल्याचेही भारतीने म्हटले आहे. त्यावर करण हसायला लागला. करणने तिच्या मुलाचे स्वागत केल्याबद्दल भारतीचे अभिनंदन केले. करण जोहरने तिच्या मुला साठी 'लकडी की काठी' हे गाणे गायले, त्यानंतर परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) भारतीला विचारले की गाणे ऐकल्यानंतर मूल ठीक आहे का?

भारतीने उत्तर दिले, "मुल ठीक आहे," भारती तिच्या मुलाला पुढे म्हणाली, "नाही बेटा, तू खूप त्रास सहन केला आहेस, आता मामू तुला लॉन्च करेल." तर या प्रोमोमध्ये भारती मिथुन चक्रवर्ती बरोबरही मस्ती करताना दिसत आहे.

भारतीने अलीकडेच तिच्या आणि हर्ष लिंबाचियाच्या यूट्यूब चॅनेल LOL (लाइफ ऑफ लिमाचिया) वर तिच्या आयुष्याबद्दल अपडेट दिले. तिने आणि हर्षने आपल्या मुलाचे नाव ‘गोल्ला’ ठेवल्याचे या जोडप्याने उघड केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा