मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; हॉटेलमध्ये घेतला गळफास

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. आकांक्षाने बनारसमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. आकांक्षाने बनारसमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, आज सकाळीच तिचे नवीन गाणे रिलीज झाले होते. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत यामध्ये ती झळकली असून 'आरा कभी हरा नहीं' असे या गाण्याचे नाव आहे.

आकांक्षा हे भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. तिने अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले होते. 25 वर्षीय आकांक्षाला अभ्यासात फारसे काही वाटत नव्हते. नृत्य आणि अभिनय ही तिची आवड बनली होती. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवरून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. तिची रिल इंस्टाग्रामवरही ट्रेंड करत असत. इन्स्टावर तिची 1.7 मिलियन फॅनफॉलोईंग करतात. यानंतर आकांक्षाला मॉडेलिंग आणि अभिनयाच्या ऑफर्स आल्या.

आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने वयाच्या १७ व्या वर्षी भोजपुरी इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. भोजपुरी इंडस्ट्रीत काम करणं तिच्यासाठी सोपं राहिलेलं नाही. अनेकवेळा नकाराचा सामना करावा लागला. आशी तिवारीसोबत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण असे अजूनही तिला हवे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर अभिनेत्रीने 2018 मध्ये खुलासा केला की ती नैराश्यामुळे फिल्मी जगाला अलविदा करत आहे. मात्र, आईच्या समजूतीनंतर आकांक्षा पुन्हा भोजपुरी इंडस्ट्रीत परतली.

आकांक्षाने खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. 'वीरों के वीर' आणि 'कसम पडने वाले की 2' या चित्रपटांव्यतिरिक्त, ती 'नच के मालकिनी', 'भुआरी' आणि 'कशी हिले पटना हिले' सारख्या गाण्यांसह अनेक संगीत व्हिडिओंमध्ये देखील दिसली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार