Bholaa Motion Poster Team Lokshahi
मनोरंजन

भोला चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून अजय देवगण झाला ट्रोल

'दृश्यम 2' च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट 'भोला' चे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

'दृश्यम 2' च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट 'भोला' चे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. तब्बूसोबत 'भोला' मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने 'भोला'चे दिग्दर्शनही केले आहे, मात्र अजय देवगणला दिग्दर्शनाबाबत सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने अजय देवगणच्या मोस्ट अवेडेट चित्रपट 'भोला' मोशन पोस्टर रिलीज केले. या मोशन पोस्टरहून हा अंदाज येतो की, अजयचा हा चित्रपट फुल ऑन एक्शन पॅकेज असणार आहे. तर 'भोला' च्या डायरेक्शनवरून नेटिझन्सने अजय देवगणवर निशाना साधलाय. तरणकडून इंस्टाग्रामनर शेअर करण्यात आलेल्या 'भोला' च्या मोशन पोस्टरखाली कमेंटमध्यो यूजर्स अजयला ट्रोल करत आहेत.

याआधी अजयने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 चे दिग्दर्शन केले आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 'भोला' हा चित्रपट साऊथ सुपरस्टार कार्ती शिवकुमारचा सुपरहिट चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. 2019 मध्ये आलेल्या कैथी या तमिळ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मोशन पोस्टरसोबत 'भोला'चा टीझरही जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला सांगतो की भोलाचा टीझर मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या