Admin
मनोरंजन

‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस; ‘जलसा’ बाहेर चाहत्यांची गर्दी

आज बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अमिताभ बच्चन स्वत: चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमिताभ बच्चन हे सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासह बिग बी आज केबीसीच्या स्टेजवर पोहोचून चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहेत.

अमिताभ बच्चन मध्यरात्रीनंतर त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानातून बाहेर आले होते. त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या. त्यांच्या फॅन्समध्ये चांगला उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."