मनोरंजन

‘बिग बॉस १५’ चा नवीन प्रोमो प्रदर्शित

Published by : Lokshahi News

रियालिटी शो 'बिग बॉस' यंदा ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे लाँच करण्यात आला.हा शो करण जोहर होस्ट करत आहे. ओटीटीवरील 'बिग बॉस' लोकांना आवडलेला दिसतोय. आता 'बिग बॉस' १५ चा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

कलर्सने बिग बॉस १५ चा एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीत दिसून येतोय. एकंदरीत बिग बॉस १५ चा हा प्रोमो खूपच इंटरेस्टिंग आहे.काही वेळापूर्वीच शेअर केलेल्या या प्रोमोला आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रोमोवर प्रेक्षक देखील त्यांची उत्सुकता दर्शवणारे वेगवेगळे कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

टीव्हीवर 'बिग बॉस' सुरू करण्यापूर्वी करण जोहर होस्ट करत असलेल्या ओटीटीवर हा शो सुरू झालाय. बिग बॉस ओटीटी हा शो एकूण 6 आठवडे प्रसारित होणार आहे. त्यापैकी सुमारे 2 आठवडे पूर्ण झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."