मनोरंजन

BIG BOSS 15 WINNER | तेजस्वी प्रकाशच्या पहिल्या म्युजिक व्हिडिओचे पोस्टर आउट

Published by : Team Lokshahi

तेजस्वी प्रकाश (Tejasswi prakash) आणि करण कुंद्रा (karan kundrra) हे टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार कपल बनले आहेत. बिग बॉस या रीयॅलिटी (Reality show) शोमध्येच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉस Big Boss फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या फेमस जोडीने त्यांच्या चाहत्यांसाठी सरप्राईज आणलं आहे.


करण कुंद्राने आपल्या ऑफिशियल इंन्टाग्राम Instagram अकाउंटवर त्यांच्या येत्या गाण्याचे पोस्टर रीलीज केले आहे. दोघांचेही 'रुला देती है' (Rula Deti hai) हे रोमॅटिक नवीन गाणे आहे. ज्यामध्ये करण आणि तेजस्वीच्या केमिस्ट्रीने (chemistry) चाहत्यांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस 15 नंतर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. ज्यामध्ये ते पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. हे गाणे 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
करण कुंद्राने त्याच्या म्युझिक व्हिडिओचे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये (Caption) लिहिले की 'रुला देती है' हे गाणे माझ्यासाठी खुप खास आहे. तेजस्वीसोबतचे हे माझे पहीले काम आहे.
ह्यावर प्रतिक्रीया देत तेजस्वी प्रकाश म्हणाली, करण आणि मी एकत्र काम करण्याची आतुरतेने वाट बघत होतो. रुला देती है ह्या गाण्याच्या माध्यमातून आमची ही आतुरता अखेर संपली. हे गाणे मनाला स्पर्शून जाणारं आहे तुम्हाला हे गाणे नक्कीच आवडेल.
हे एक सॅड आणि रोमँटिक  गाण्याचे कँम्बिनेशन आहे. गाण्याचे संपूर्ण शुटींग हे गोव्यात झाले. रुला देती है गाणं राणा सोतलने (Rana Sotal) लिहीले असुन यासर देसाईने (Yasser desai) हे गाणं गायलं आहे. गाण्याला संगीत रजत नागपाल (Rjat Nagpal) ह्यांनी दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?