मनोरंजन

Big Boss OTT 3: सना मकबुल ठरली बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती, ट्रॉफीसह केली इतकी कमाई...

या सिजनमध्ये अनिल कपूरने त्याच्या झकास होस्टींगसह बिग बॉसचा प्रेक्षक तसाच टिकवून ठेवला. बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेदरम्यान बिग बॉसला त्यांचा विजेता मिळाला आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉसचा चाहतावर्ग हा मोठ्याप्रमाणात आहे, त्यात यंदाच बिग बॉस ओटीटी 3 हे सिजन अनिल कपूरने त्याच्या हटके अंदाजाने पार पाडलं. जूनपासून सुरु झालेल्या बिग बॉस ओटीटी 3 या सिजनमध्ये अनिल कपूरने त्याच्या झकास होस्टींगसह बिग बॉसचा प्रेक्षक तसाच टिकवून ठेवला. बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेदरम्यान बिग बॉसला त्यांचा विजेता मिळाला आहे. बिग बॉसच्या या ग्रँड फिनालेमध्ये 'स्त्री २' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणारे कलाकार श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे उपस्थित होते. यांच्या उपस्थित शोचा विजेता घोषित करण्यात आला.

यंदाच्या बिग बॉस ओटीटी 3 मध्ये रणवीर शौरी, नेझी, सना मकबूल, साई केतन आणि कृतिका मलिक हे टॉप 5 स्पर्धक होते. त्यातून रॅपर नेझी आणि सना मकबुल हे दोघे फायनलपर्यंत पोहचले. यानंतर सना मकबूल हीने बिग बॉस ओटीटी 3 च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले, आणि त्याचसोबत तिने तिच्या चाहत्यांची मन देखील जिंकली. बिग बॉस ओटीटी 3 ची ट्रॉफी पटकावल्यानंतर सनाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया यूजर्सद्वारे तिच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. त्याचसोबत तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. बिग बॉस ओटीटी 3 च्या चमकदार ट्रॉफीसह सनाला २५ लाखांचे रोख बक्षीस मिळाले आहे. यादरम्यान सनाच्या पुढील वाटचालीसाठी चाहत्यांकडून आणि तिच्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?