big boss 16  Team Lokshahi
मनोरंजन

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'या' तारखेपासून सुरु होणार सीझन १६, जाणून घ्या स्पर्धकांची नावे

शहनाज गिल देखील सलमान खानसोबत शो होस्ट करताना दिसणार

Published by : Sagar Pradhan

सलमान खान अनेक वर्षांपासून बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने लोकांचा मनात चांगलीच जागा बनवली आहे. बिग बॉस हा शो देशातील सर्वात चर्चित आणि प्रसिध्द शो आहे. या शोमुळे अनेकांना नवीन स्थान दिले आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा हा शो नव्या सीझनसह परत येतोयं. बिग बॉस 16 साठी निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 16 हे 8 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते.

दरम्यान, नेहमीप्रमाणे नव्या रंग-रूपात हा शो चाहत्यांसाठी येतो. यंदाही बिग बॉस 16 च्या सीझनचे थीम खूप वेगळी असल्याचे बोलले जात आहे. यावेळी थीम Turqouise असू शकते. बिग बॉस 16 च्या प्रीमियरच्या दिवशी शहनाज गिल देखील सलमान खानसोबत शो होस्ट करताना दिसणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकताच, बिग बॉस 16 च्या प्रीमियरची तारीख जाहीर झाल्यानंतर, प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. यावेळी कोणते सेलिब्रिटी बिग बॉस 16 च्या घरात येणार आहेत हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे. या यादीत पहिले नाव आले आहे ते म्हणजे मुनवर फारुकी यांचे. मुनावर हा स्टँड-अप कॉमेडियन आहे.

हे स्पर्धक दिसणार बिग बॉस १६ मध्ये

(आतापर्यंत अपेक्षित)

1. मुनावर फारुकी

2. फरमानी नाझ

3. ट्विंकल कपूर

4. फैसल शेख (श्री. फैसू)

5. अंकिता लोखंडे

6. व्हिव्हियन डीसेना

7. कनिका मान

8. शिवीन नारंग

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा