Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Lokshahi Team
मनोरंजन

'बिग बी' यांचे ट्रोलर्सना प्रतिउत्तर

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे नेहमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमिताभ इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर काही ना काही पोस्ट करत राहतात आणि त्यांच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत राहतात. बिग बींना आपल्या पोस्टमुळे अनेकवेळा ट्रोलर्सना सामोरे जावे लागले असले तरी ते ट्रोलिंगलाही अतिशय नम्रपणे हाताळतात.

बिग बींनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात ट्रोल देखील झाले. मात्र अमिताभ यांनी ट्रोल करणाऱ्यांना इतक्या प्रेमाने उत्तर दिले की त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. 'बिग बीं' यांनी15 मे रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आपल्या चाहत्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर आता दुपार होणार आहे असे म्हणत लोकांनी त्यांना ट्रोल केले. पोस्टवर कमेंट करताना यूजर्सनी काही अपशब्दही वापरले परंतु बिग बींनी जास्त मनावर घेतलं नाही.पोस्टवर लाईक करणाऱ्या एका व्यक्तीने पोस्टवर कमेंट करताना लिहिले की 'ओ बूढ़ा है 12 बजा रहा है और अभी गुड मॉर्निंग'. युजरच्या या कमेंटवर बिग बींनी उत्तर दिले, 'मी सांगतो, सत्य सांगत आहे. मी देशात आहे आणि रात्रभर काम करत होतो त्यामुळे उशिरा जाग आली.

दुसर्‍या यूजरने लिहिले की 'आज खूप उशीर झाला.. आजकाल सकाळी साडेअकरा वाजता 'देसी पे आ गये हैं' असे दिसते. याला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की ते स्वत: मद्यपान करत नाहीत तर मद्यपानात इतरांना पेय देतात. हरी ओम पांडे नावाचा माणूस अमिताभला म्हणाला, "जय श्री राम." यावर अमिताभ बच्चन यांनीही खास प्रतिक्रिया दिली. 'हरिओम पांडे बोल सिया पति रामचंद्र की जय' अशी टिप्पणी त्यांनी केली.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...