Rakhi Vijan  Team Lokshahi
मनोरंजन

Rakhi Vijan : दयाबेनच्या भूमिकेबद्दल मोठा निर्णय...

14 वर्षांपासून हा शो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम करत आहे.

Published by : prashantpawar1

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. 14 वर्षांपासून हा शो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम करत आहे. शोमध्ये वेळोवेळी बदल होत असले तरी देखील अनेक दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची एन्ट्री होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे कारण शोसाठी नवीन दया बेन सापडलेली आहे. ती शोमध्ये केव्हा परतणार यावर तूर्तास शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. मात्र मनोरंजन विश्वातील आलेल्या काही बातम्यांनुसार या शोला त्यांची नवी दया मिळाली असं म्हटलं आहे. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री राखी विजान (Rakhi Vijan) आगामी काळात दयाबानेच्या भूमिकेत परत येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की राखी अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी राखीला संपर्क करण्यात आला होता. याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही परंतु ती पुन्हा टीव्हीवर आली तर तिला पाहणे मनोरंजक ठरेल. माहितीसाठी तुम्हास सांगतो की राखी एकता कपूरच्या हिट शो 'हम पांच'चा महत्त्वाचा भाग आहे.

सूत्रांच्या मते दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी राखी विजानला संपर्क करण्यात आला आहे. राखी ही सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याची कॉमिक टायमिंग चांगली आहे. विजानने याआधी 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात', 'नागिन 4' सारख्या शोचा भाग केला आहे. यासोबतच तिने 'गोलमाल रिटर्न्स' सारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केलेलं आहे. ही अभिनेत्री 'बिग बॉस 2' मध्येही सहभागी झाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा