S.S. Rajamoli Lokshahi Team
मनोरंजन

S.S. Rajamoli : एसएस राजमौली यांचा मोठा निर्णय....

सर्वांच्या नजरा राजामौली यांच्या पुढील चित्रपटाकडे आहेत.

Published by : prashantpawar1

बाहुबली या चित्रपटासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली(S.S Rajamoli) नुकताच राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय केला. सर्वांच्या नजरा राजामौली यांच्या पुढील चित्रपटाकडे आहेत ज्याने त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Box office) धमाका केला. सूत्रांच्या माहितीनुसार राजामौली यांनी त्यांच्या आगामी 'महाभारत' प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे. मिंटला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजामौली यांनी 'महाभारत'च्या प्लॅनिंगबद्दल सांगितले. भारतीय महाकाव्य पडद्यावर आणण्यासाठी महाभारतापेक्षा श्रेष्ठ कोणीही असू शकत नाही असं ते म्हणाले.

राजामौली म्हणतात की 'महाभारत हा माझा ड्रीम प्रोजेक्ट (Dream Project) आहे ज्यावर मी खूप दिवसांपासून काम करत आहे. "मला तो बिग प्रोजेक्ट् बनवायचा आहे. आणि मला भारतीय कथा इतर जगाला सांगायच्या आहेत. आता त्यावर काम करायला काही वेळ लागणार असला तरी ते बनवण्यापूर्वी तीन-चार चित्रपटांवर काम करतील. एकीकडे राजामौली यांची महाभारताची तयारी सुरूआहे. तर दुसरीकडे प्रेक्षक या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुक आहेत. मात्र सध्या या चित्रपटाची कथा आणि कलाकार याबाबत फारसा खुलासा झालेला नाही. परंतु हा एक बिग बजेट चित्रपट असेल जो बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचू शकतो असं देखील ते म्हणाले.

एस.एस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर 'आरआरआर' हा चित्रपट अल्पावधीतच प्रदर्शित झाला होता. ज्याने बॉक्सऑफिसवर कमाईचे काही विक्रम तोडले. यामध्ये राम चरण(Ram Charan), ज्युनियर एनटीआर(Jr. NTR)एन. टी. रामाराव जूनियर, आलिया भट्ट (alia bhat)आणि अजय देवगण(Ajay Devgan) यांसारख्या बड्या कलाकारांचा समावेश होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींचा आकडा पार केला. यासोबतच या चित्रपटाने हॉलिवूडमध्येही नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य