मनोरंजन

मोठी बातमी! संजय दत्तचा शुटींगदरम्यान अपघात; अशी आहे अवस्था

संजय दत्तचे चाहते चिंतेत पडले असून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान त्याच्यासोबत ही घटना घडली. हे समजताच संजय दत्तचे चाहते चिंतेत पडले असून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

संजय दत्त 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटाची बेंगळुरूमध्ये शूटींग करत होता. यादरम्यान बॉम्ब सीक्वेंसच्या शूटिंगदरम्यान हा अपघात घडला व यामध्ये संजय दत्त जखमी झाला आहे. यात संजयला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर संजय दत्तने शूटिंगलाही सुरुवात केली आहे, अशी माहिती चित्रपटाच्या टीमने दिली आहे. संजय दत्तच्या अपघाताच्या बातमीने चाहत्यांनाही धक्का बसला असून त्याच्या प्रकृतीसाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, केडी हा एक पीरियड अ‍ॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट 1970 मध्ये बेंगळुरूमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. केजीएफ 2 नंतर संजय दत्त पुन्हा एकदा केडीमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त अ‍ॅक्शन हिरो ध्रुव सर्जासोबत दिसणार आहे. तर, रणबीर कपूरच्या शमशेरामध्येही संजयने खलनायकाची भूमिका साकारली होती. संजयच्या आगामी चित्रपटांमध्ये लिओ आणि द गुड महाराजा यांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा