मनोरंजन

टायगर 3 चित्रपटामधील "लेके प्रभु का नाम" या पहिल्या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

टायगर 3 च्या पहिल्या गाण्याच्या लेके प्रभु का नाम च्या फर्स्ट लूकने काल इंटरनेटवर धुमाकूळ घातला. फोटो मध्ये सलमान आणि कतरिना तुर्कीतील कॅपाडोशिया येथे एका सुंदर ठिकाणी गाण्यावर थिरकताना दिसले.

Published by : Team Lokshahi

सलमान खान आणि कतरिना कैफ हे भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वात मोठे ऑन-स्क्रीन जोडपे आहेत. त्यांनी ऐतिहासिक ब्लॉकबस्टर आणि जनरेशन टू जनरेशन चालणारे चार्टबस्टर दिले आहेत. आता ते पुन्हा आदित्य चोप्राच्या टायगर 3 मध्ये त्यांच्या प्रतिष्ठित पात्रांची, सुपर-एजंट टायगर आणि झोयाची वायआरएफ स्पाई युनिवर्स मध्ये पुन्हा दिसणार आहेत. त्यामुळे इंटरनेट वर एकच धुमाकूळ आहे.

टायगर 3 च्या पहिल्या गाण्याच्या लेके प्रभु का नाम च्या फर्स्ट लूकने काल इंटरनेटवर धुमाकूळ घातला. फोटो मध्ये सलमान आणि कतरिना तुर्कीतील कॅपाडोशिया येथे एका सुंदर ठिकाणी गाण्यावर थिरकताना दिसले. आज, YRF ने सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या गाण्याच्या टीझरद्वारे लोकांना चकित करून लेके प्रभु का नामची अपेक्षा वाढवली आहे.

प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या वाईबी डान्स ट्रॅकमध्ये सलमानआणि कतरिनाची अविश्वसनीय केमिस्ट्री दिसते. दोन्ही सुपरस्टार या गाण्यात अतिशय सुंदर दिसत आहेत. जे या उत्सवाच्या हंगामात नक्कीच पार्टी अँथम बनेल. मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 यावर्षी दिवाळीत 12 नोव्हेंबर, रविवारी रिलीज होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा