मनोरंजन

Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाश ठरली ‘बिग बॉस 15’ ची विजेती

Published by : Lokshahi News


रविवारी 30 जानेवारीला बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले पार पडला. या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित करण्यात आले, तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात आलं. या 'बिग बॉस 15′ चा विजेता कोण ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर टिव्ही सिरियलची लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सर्वाधिक मतांनी बिग बॉस 15' ची विनर ठरली.

30 जानेवारीला पार पडलेल्या 'बिग बॉस 15' चा ग्रँड फिनालेमध्ये शोचे 5 फायनलिस्ट स्पर्धक करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, निशांत भट्ट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. सर्वप्रथम, शोमधील 10 लाखांचे बक्षीस घेऊन निशांतन शोमधून बाहेर पडला. त्यानंतर शमिता शेट्टी टॉप-3 मधून बाहेर पडली.

सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून सलमान भावूक झाला
शोमध्ये आलेल्या माजी विजेत्यांसह बिग बॉस 15 च्या काही स्पर्धकांसोबत डान्स स्पर्धा झाली. नाही, दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे त्यासोबत शहनाज गिलही शोमध्ये आल्या होत्या आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची आठवण करून ती आणि सलमान खान दोघेही भावूक झाले.

तेजस्वीला एक मोठी ऑफर मिळाली
यंदाचे 'बिग बॉस 15' हे सीजन मोठ्या प्रमाणात गाजले आहे. यातील बिग बॉस 15'च्या सदस्या तेजस्वी प्रकाश पूर्ण सीजनमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. तेजस्वीने घरातील प्रत्येक टास्क व्यवस्थितरित्या पार पाडला आहे. मात्र, आता हे सीजन संपण्याअगोदरच तेजस्वीला एक मोठी ऑफर मिळाली. सुत्रांच्या माहितीनुसार, तेजस्विनी लवकरच अभिनेत्री एकता कपूरसोबत एका सीरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला 'नागिन' च्या सहाव्या सीजनसाठी विचारले आहे. तेजस्वीने 'बिग बॉस 15' मध्ये आपल्या दमदार खेळीने आणि याअगोदर छोट्या पडद्यावरील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती