Mahek Chahal Team Lokshahi
मनोरंजन

'बिग बॉस' फेम महक चहलची बिघडली तब्येत; चार दिवस व्हेंटिलेटरवर

''नागिन ६' फेम अभिनेत्री महक चहल गेल्या 4 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : shamal ghanekar

'नागिन ६' फेम अभिनेत्री महक चहल गेल्या 4 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. तिची तब्येत इतकी खालावली की, तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आता तिची तब्येत पहिल्यापेक्षा ठीक आहे पण तरीही तिची ऑक्सिजनची पातळी वर-खाली होत आहे.

महक चहल 3 ते 4 दिवस आयसीयूमध्ये होती. तिला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते. 2 जानेवारीला अचानक महकच्या छातीत दुखायला लागले. तिला श्वासही घेता येत नव्हता. त्यामुळे तिला लगेच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आता तिच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे,

महक चहल ही 'बिग बॉस 5' आणि 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोजमधून तिला पाहिलं आहे. सध्या महक 'नागिन 6'मध्ये काम करत असून या शोमध्ये ती महत्त्वाची भुमिका साकारते आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा