BIGG BOSS MARATHI 5 WINNER SURAJ CHAVAN DREAM BUNGALOW NAME AND INSPIRATIONAL JOURNEY 
मनोरंजन

Suraj Chavan : बिग बॉसचे नाव न देता सूरज चव्हाणने स्वप्नातील बंगल्याला दिलं 'हे' नाव

Inspirational Journey: बिग बॉस मराठी ५ चा विजेता सुरज चव्हाण आता विवाहानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. त्याच्या स्वप्नातील बंगल्याला दिलेलं ‘

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता सुरज चव्हाण आता पूर्णपणे संसारी गृहस्थ झाला आहे. गेल्या महिन्यात थाटामाटात झालेल्या त्याच्या लग्नाने चाहत्यांना आनंद दिला. संजना चव्हाण आता त्याच्या आयुष्याची जोडीदार बनली आहे. मात्र लग्नापूर्वीच सुरजने चाहत्यांसोबत आणखी एक गुड न्यूज शेअर केली होती, ती म्हणजे त्याच्या नव्या आलिशान बंगल्याची. बारामती तालुक्यातील मोढवे गावातील या साध्या तरुणाचा प्रवास दोन पत्र्यांच्या खोलीपासून बंगल्यापर्यंत खूप गाजला.

सुरजने बिग बॉस जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तेव्हा घर बांधून देण्याचं आश्वासन मिळालं. त्यानुसारच हे स्वप्नातील घर तयार झालं. गृहप्रवेशाच्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुरजने अजित दादांचे आभार मानले. घरात मॉड्युलर किचन, हाय सिलिंग, आकर्षक लायटिंग आणि अद्ययावत सुविधा आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या सुरज आणि संजना या बंगल्यात सुखी जीवन जगत आहेत. ते तिथले फोटो सतत शेअर करतात.

चाहत्यांनी फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी भावूक होऊन म्हटलं, "तुझे आई-वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता." सुरजने लहानपणीच आई-वडील गमावले. गरिबी आणि हलाखीतून बाहेर पडण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. बिग बॉस घरातही तो आई-वडिलांबद्दल अनेकदा भावूक झाला होता.

आता सुरजच्या या बंगल्याचं नाव समोर आलं आहे. नेमप्लेटवर ‘आई आप्पांची पुण्याई’ असं लिहिलेलं आहे. बिग बॉस आणि अजित पवार यांच्या मदतीने बांधलेल्या घराला आई-वडिलांच्या नावाने सन्मानित करून सुरजने त्यांना आदरांजली वाहिली. बंगल्याच्या बाहेरील नेमप्लेटवर वर ‘आई-अप्पांची पुण्याई’ आणि खाली श्री. सुरज चव्हाण व सौ. संजना चव्हाण अशी नावं कोरलेली आहेत. या नावाने चाहत्यांमध्ये भावनांचा उद्रेक झाला आहे.

सुरजचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. गरिबीतून यशस्वी होऊन आई-वडिलांच्या स्मृतींना कायम ठेवणारा हा तरुण प्रत्येकासाठी आदर्श आहे.

  • बिग बॉस मराठी ५ चा विजेता सुरज चव्हाण झाला संसारी गृहस्थ

  • बारामतीतील बंगल्याला दिलं भावूक नाव ‘आई-अप्पांची पुण्याई’

  • गरिबीतून यशापर्यंतचा सुरजचा संघर्षमय प्रवास

  • चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुक आणि भावनिक प्रतिक्रिया

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा