Bipasha Basu Baby Team Lokshahi
मनोरंजन

Bipasha Basu Baby : बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने ठेवलं आपल्या मुलीचं खूप खास नाव

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. आलिया भट्ट नंतर आता बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरने आज एक गोंडस मुलीचे पालक झाले आहेत.

Published by : shweta walge

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. आलिया भट्ट नंतर आता बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरने आज एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. अभिनेत्री बिपाशा बासूने शनिवारी मुलीला जन्म दिला आहे. ही माहिती तीच्या टीमने दिली असून आता खुद्द जोडप्याने या गुड न्यूजला दुजोरा दिला आहे. एक हृदयस्पर्शी नोट देखील शेअर केली आणि त्यांनी त्यांच्या छोट्या मुलीचे नाव काय ठेवले आहे ते देखील सांगितले...

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. या आनंदाच्या बातमीने चाहतेही खूप खूश आहेत आणि सोशल मीडियावर दोघांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. चाहते बिपाशा आणि करणच्या लाडकीच्या एका झलकची वाट पाहत आहेत आणि या जोडप्याने प्रतीक्षा संपवण्यासाठी पोस्ट शेअर केली.

बिपाशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हे जोडपे त्यांच्या छोट्या देवदूताचे पाय आपल्या तळहातावर धरलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करताना जोडप्याने लिहिले - "आमच्या प्रेमाचे आणि आईच्या आशीर्वादाचे भौतिक प्रकटीकरण आता येथे आहे आणि ती दैवी आहे". यासोबत त्यांनी मुलीचे नाव सांगताना लिहिले - "देवी बासू सिंग ग्रोवर".

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि 2015 मध्ये एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, 2016 मध्ये या जोडप्याने लग्न केले. काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती आणि तेव्हापासून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत अपडेट्स शेअर करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट