Bipasha Basu Team Lokshahi
मनोरंजन

Bipasha Basu : बिपाशा बसू प्रेग्नेंसीमध्ये हाय हिल्स घालून दिसली, सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका

बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल केले जाते. कधी त्याच्या पेहरावाबद्दल तर कधी काही विधानाबद्दल.

Published by : shweta walge

बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल केले जाते. कधी त्याच्या पेहरावाबद्दल तर कधी काही विधानाबद्दल. अलीकडे बिपाशा बसूला तिच्या उंच हिल्समुळे ट्रोलचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच अभिनेत्री तिच्या ड्रेससह हाय हील्समध्ये दिसली होती. याआधी आलिया भट्टलाही चाहत्यांनी गरोदरपणात हाय हिल्स घालण्याबद्दल ट्रोल केले होते.

आलिया भट्टनंतर चाहते बिपाशा बसूला प्रेग्नेंसीमध्ये हील्स न घालण्याचा सल्ला देत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिपाशा बसू हिल्ससह सैल ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच बिपाशा बसू ट्रोल होत आहे. लोक तिला गरोदरपणात हिल्स न घालण्याचा सल्ला देत आहेत. याशिवाय अनेक लोक तीच्यावर टीका करत आहेत.

बिपाशा बसू लग्नाच्या सहा वर्षानंतर आई होणार आहे. तिने 2016 मध्ये करण ग्रोवरशी लग्न केले. बिपाशाने ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली होती की ती आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने बेबी शॉवर देखील केला होता, ज्याचे फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये बिपाशा लाइट पिंक कलरच्या गाऊनमध्ये बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली.


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बिपाशाने 2001 मध्ये 'अजनबी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तीने राज, गुनाह, जिस्म, जमीन, ऐतबार, रक्त, माधोशी, अपहरण, फिर हेरा फेरी, कॉर्पोरेट, धूम 2, रेस, बचना ए हसीनो, ऑल द बेस्ट, लम्हा यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री शेवटची 2015 मध्ये आलेल्या अलोन चित्रपटात दिसली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा