मनोरंजन

Birthday special Disha Patani| फिटनेस प्रेमी दिशा पटानी

Published by : Lokshahi News

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड अंदाजासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा पटानीचा आज तिचा 29वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी दिशा वाढ दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दिशा पटानीचा जन्म उत्तराखंडमधील पिथोरागढमध्ये झालाय. त्यानंतर तिचं कुटुंब बरेलीमध्ये स्थायिक झालं. दिशाला एक मोठी बहीण असून तिचं नाव खुशबू पटानी असं आहे.

दिशा पटानीने नोएडा इथल्या एमिटी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय.

दिशाने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली. २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. यात ती पहिली रनरअप ठरली.

सध्या दिक्षाचं मुंबईमध्ये आलिशान घरं आहे. 2017 सालात दिशाने वांद्रे इथं एक फ्लॅट खरेदी केला असून या घराची किंमत तब्बल ५ कोटी रुपये आहे. दिशाच्या घराचं नाव 'लिटिल हट' असं आहे.

दिशाने आता पर्यत 9 सिनेमांमध्ये काम केले आहे, तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या अफेअरमुळे कायम चर्चेत राहिली. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथानला दिशआ डेट करत होती. मॉडेलिंग करत असताना जवळपास १ वर्ष दिशा आणि पार्थ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर मात्र दोघांचं ब्रेकअप झालं.

त्यानंतर दिशा आणि टायगरची मैत्री झाली आणि ते एमेमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. दिशा आणि टायगरला अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. माक्ष अजूनही त्यांनी त्यांच्या अफेअरची कबुली दिलेली नाही.

दिशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

मध्यंतरी दिशाचे नाव आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुद्धा जोडले गेले होते.

लवकरच दिशा 'व्हिलन-२' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
(photo- instagram@dishapatani)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट