मनोरंजन

Big B Plea in High court | बिग बींना हायकोर्टाचा मोठा दिलासा; बीएमसीच्या रस्ता रुंदीकरणाच्या नोटीसला आव्हान

Published by : Shweta Chavan-Zagade

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना ( BMC plea in Mumbai high court ) मुंबई महापालिकेने निवासी बंगल्याबाहेर रस्ता रुंदीकरणासंदर्भात नोटीस ( BMC notice to Amitabh Bachchan ) बजाविली होती. मात्र आता अमिताभ बच्चन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडण्यास स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बंगल्याची संरक्षण भिंत तूर्तास न पाडण्याचे मुंबई पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचा विचार ( road expansion by BMC ) करावा, आवश्यक असल्यास अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला आदेश ( high court order on Amitabh Case ) दिले आहेत.

एखाद्या सामान्य व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यास ते बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी पालिका कारवाई करते. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर कारवाई ( Amitabh Bachchan bungalow Land Possession ) करण्यास कंत्राटदार मिळत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे कारण महापालिकेने लोकायुक्तांकडे दिले आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासाठीच्या भूखंडाचा काही भाग पालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी ( Juhu Road Widening ) घेतला जाणार आहे. त्यानंतरही जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित