मनोरंजन

Covid Positive | कार्तिक आर्यनला करोनाची लागण

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोना पुन्हा आपले डोके वर काढताना दिसत आहे. मुंबईमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही. अभिनेता रणबीर कपूरनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज बायपेयी अशा अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. आता अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aaryan) याला सुधा कोरोनाची लागण झाली आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत स्वत: त्याच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. कार्तिकने एक प्लसचं चिन्ह असलेला फोटो शेअर केला आहे. "पॉझेटिव्ह हो गया. दुवा करो" असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. अनेक चाहत्यांनी कार्तिकला लवकर बरा हो असं कमेंटमध्ये म्हंटलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या 'भुलभुलैया-2' मध्ये कार्तिक मुख्य भूमिकत झळकणार आहे. याच सिनेमाच्या शूटींगमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा