मनोरंजन

'Dhoom 4' : रणबीर कपूर धमाल करण्यास सज्ज, अयान मुखर्जी दिग्दर्शित करणार! सविस्तर जाणून घ्या

रणबीरचा धूम 4 मध्ये नवा अंदाज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

Published by : Shamal Sawant

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि अॅक्शनने भरलेल्या फ्रँचायझींपैकी एक असलेली ‘धूम’ मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. कारण, ‘धूम 4’ मध्ये अभिनेता रणबीर कपूर एका पूर्णपणे नवीन लूकमध्ये झळकणार असून, यासाठी त्याने तयारीलाही सुरुवात केली आहे.

रणबीरचा ‘धूम’ अवतार

रिपोर्ट्सनुसार, धूम 4 मध्ये रणबीरचे पात्र हे त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आणि दमदार असणार आहे. त्याचा लूक आणि व्यक्तिरेखा खास त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी असून, निर्माते त्यावर बारीक लक्ष ठेवून काम करत आहेत. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्व धूम चित्रपटांपेक्षा भव्य आणि वेगळा असणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा सध्या लेखक श्रीधर राघवन यांच्या सहकार्याने पटकथेवर काम करत आहेत. धूम 4 हा केवळ पुढचा भाग नसून, तो संपूर्ण फ्रँचायझीसाठी रीबूट म्हणून तयार केला जात आहे. त्यामुळे कथा, अॅक्शन, संगीत आणि लूक सर्वच नवीन आणि आधुनिक युगाशी सुसंगत असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अॅक्शन सीन जागतिक पातळीवरील अॅक्शन चित्रपटांना टक्कर देतील.

चित्रपटाचं शूटिंग 2026 च्या उन्हाळ्यात सुरू होणार आहे. सोशल मीडियावर #Dhoom4WithRanbir आणि #RanbirKapoor ट्रेंड होताना दिसत आहेत. अनेकांनी "आता खरी धूम सुरू होईल!" अशा कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी हृतिक रोशनलाही परत यावं अशी मागणी केली आहे, कारण धूम 2 मधील त्याचा करिष्मा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा