काही दिवसांपूर्वी एका लग्नाआमध्ये ऐश्वर्या, अभिषेक एकत्र दिसले होते. त्याचप्रमाणे एअरपोर्टवरदेखील ऐश्वर्या, अभिषेक व लेक आराध्या एकत्र दिसून आले होते. 2007 साली दोघही लग्नबंधनात अडकले होते. मात्र त्यांच्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. बॉलिमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच लवकरच दोघंही घटस्फोट घेऊन वेगळे होतील आशादेखील चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये अभिषेक व ऐश्वर्या यांच्यामधील दुरावा दिसून आला होता. अभिषेक संपूर्ण कुटुंबासहित हजर राहिला होता तर ऐश्वर्या लेकीबरोबर एकटीच हजर राहिलेली दिसून आली. याचवेळी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या.
नंतर अनेकदा ऐश्वर्या एकटीच दिसून आली . त्याचप्रमाणे ऐश्वर्याच्या वाढदिवसालादेखील बच्चन कुटुंबातील एकही सदस्य दिसून आला नाही. तसेच अभिषेकने बायकोसाठी पोस्टदेखील केली नव्हती. मात्र आता अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 5 फेब्रुवारी रोजी अभिषेकचा वाढदिवस पार पडला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पत्नी ऐश्वर्याने दिलेल्या शुभेच्छा मात्र अधिक लक्षवेधी ठरल्या.
ऐश्वर्याने अभिषेकचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो खेळण्यातील एका कारमध्ये बसलेला दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्याने लिहीले की, "तुला वाढदिवसांच्या खुप शुभेच्छा. तुला खुप प्रेम, आनंद आणि चांगले आरोग्य लाभो. गॉड ब्लेस यू". त्यामुळे आता ऐश्वर्याची या पोस्टमुळे दोघांमध्ये सगळं सुरळीत असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना खुप आनंद झाला आहे.
काही दिवसांपूर्वी एका लग्नाआमध्ये ऐश्वर्या, अभिषेक एकत्र दिसले होते. त्याचप्रमाणे एअरपोर्टवरदेखील ऐश्वर्या, अभिषेक व लेक आराध्या एकत्र दिसून आले होते. 2007 साली दोघही लग्नबंधनात अडकले होते. मात्र त्यांच्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.