मनोरंजन

Jacqueline Fernandez Mother passed away : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या आईचे निधन

तिची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. 6 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Published by : Shamal Sawant

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जॅकलीन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. 6 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किम या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

लीलावती रुग्णालयात उपचार:

त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. अखेर, 6 एप्रिल रोजी किम यांनी जगाचा निरोप घेतला.या दुःखद प्रसंगामुळे जॅकलीन फर्नांडिस आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.

जॅकलिनच्या आयुष्यात आईचं छत्र हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान जॅकलिनचे बॉलिवूडचे मित्र-मैत्रीण आणि इतर कलाकार अभिनेत्रीच्या आईचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि तिला धीर देण्यासाठी लीलावती रुग्णालयात भेट देत आहेत.

कलाकारांनी घेतली होती भेट :

जॅकलिनच्या आईवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा रिपोर्टही समोर आला.अभिनेता सलमान खान आणि जॅकलिनसोबत काम करणारे इतर सहकलाकारही जॅकलीनच्या आईला भेटायला गेले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द