Priyanka Chopra Team Lokshahi
मनोरंजन

Priyanka Chopra : मॅनेजरच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाकडून सरप्राईज

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पार्टीमधील एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचा पार्टीमधील एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रियांकाने तिच्या मॅनेजर अंजुला आचार्यचा (Anjula Acharay Birthday) वाढदिवसानिमित्ताने लॉस एंजेलिसमध्ये पार्टी दिल्याचा आहे. प्रियांकाने स्वतः घरी ही पार्टी आयोजित करून तिच्या मॅनेजरला सरप्राईज दिले आहे. या वाढदिवसाच्या पार्टीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रियांका आणि पती निक जोनस तसेच तिची बर्थडे गर्ल म्हणजेच मॅनेजर हे सर्व ढोलाच्या तालावर उत्साहात भांगडा करताना दिसत आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर तिच्या मॅनेजरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि फोटोही शेअर केला आहे. प्रियांकाने दिलेले सरप्राईजने तिची मॅनेजर खूप आनंदी झाली आहे. एक भावनिक पोस्ट शेअर करत तिने सगळ्याचे तिचे आभार मानले आहेत. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये प्रियांकाने हिरव्या रंगाचं जंपसूट परिधान केले होते. तर तिची मॅनेजर काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच ऑलिव्ह ग्रीन जॅकेट आणि राखाडी पँटमध्ये निक जोनस फारचं हॅन्ड्सम दिसत आहे.

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या मॅनेजरसाठी सरफ्राईज केक घेऊन येताना दिसत आहे. तर आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियांका आणि तिची मॅनेजर (Manager) आणि पती निक जोनससोबत डिनर करताना आणि ती तिच्या गर्ल गँगसोबत फोटो क्लिक करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच ते खूप धम्माल करतानासुद्धा दिसत आहे. प्रियांकाच्या मॅनेजरने पार्टीचे काही व्हिडिओ आणि फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा