बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र 'नटी बिनोदिनी' या आगामी बंगाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देव एन्टरटेनमेन्ट व्हेंचर" या चित्रपटाची प्रस्तुती केले जाणार असून त्याची निर्मिती शैलेंद्र कुमार ,सूरज शर्मा आणि प्रतीक चक्रवर्ती करणार आहेत.
शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर, दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बहुचर्चित बायोपिक 'बिनोदिनी एकटी नटीर उपाख्यान' मधील मुख्य कलाकारांची घोषणा केली. बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा ही बहुचर्चित भूमिका साकारणार आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझर पोस्टरचे अनावरण केले. त्या पोस्टरवर रुक्मिणी मैत्रा या श्री चैतन्य महाप्रभू यांच्या भूमिकेत दिसत आहेत. बिनोदिनी दासी यांनी श्री चैतन्य महाप्रभू यांची व्यक्तिरेखा रंगभूमीवर साकारली होती. रुक्मिणी मैत्रा या त्यांच्या श्री चैतन्य अवतारात ओळखूनच येत नाहीत. ज्या सूक्ष्म तपशिलांसह ही व्यक्तिरेखा साकारलेली दिसते, ती सर्वांनाच प्रभावित करणारी आहे. मोशन पोस्टर हे एकता भट्टाचार्य यांनी डिझाईन केले असून त्याला नीलायन चॅटर्जी यांनी संगीत दिले आहे.
प्रमोद फिल्म्स ,एस एस वन एन्टरटेनमेन्ट आणि पी के एन्टरटेनमेन्ट या मुंबई स्थित निर्मिती संस्थांची निर्मिती असलेल्या आणि एसोर्टेड मोशन पिक्चर्सचे सहकार्य असलेल्या या चित्रपटाची कथा ,पटकथा आणि संवाद प्रियांका पोद्दार यांनी लिहिले आहेत. "मला कायमच बंगाली प्रेक्षकांसाठी बिनोदिनी दासी यांची प्रभावित करणारी कथा सांगायची होती. अशा सांगीतिक चित्रपटाकरिता मला अपेक्षित असलेले बजेट मिळवण्याकरिता मला जवळजवळ दोन वर्षे संघर्ष करावा लागला. या सर्व प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रुक्मिणी मैत्रा.
'सिझन्स ग्रिटींग्स ' आणि 'एक दुआ ' मधील माझे काम त्यांनी पाहिलेले होते आणि त्यामुळेच बंगाली रंगभूमीवरील मेगास्टारच्या वेदना आणि तो प्रवास मी हाताळू शकेन असा मैत्रा यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. रुक्मिणी माझी बिनोदिनी होईल याचा मला आनंद आहे,” असे प्रख्यात बॉलीवूड चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी म्हणतात.
रुक्मिणी गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. या भूमिकेकरिता त्यांनी शास्त्रीय नृत्याच्या सरावापासून ते अगदी त्या काळातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीविषयी भाष्य करणाऱ्या अनेक पुस्तकांचे वाचन देखील त्यांनी केले. "माझे स्वप्न सत्यात अवतरले. ज्यावेळी राम कमल यांनी सांगितले की त्यांना बिनोदिनी निर्माण करायची आहे, तेव्हापासून मला माहित होते की त्यांचा या विषयावरचा वेगळा दृष्टिकोन असेल. त्यांना एकही प्रश्न न विचारता मी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी घडला असता, परंतु कोरोना महामारीने संपूर्ण परिस्थिती बदलली.आपल्या मनोरंजन उद्योगावर खूप परिणाम झाला. असे नामांकित बॅनर्स, निर्माते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देव हे प्रस्तुतकर्ते म्हणून आमच्यासोबत आल्याने हा चित्रपट नक्कीच भव्य निर्मिती करणारा ठरणार आहे, असे रुक्मिणी मैत्रा सांगतात.
मुंबईतील प्रमोद फिल्म्सचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रमोद चक्रवर्ती यांचा नातू प्रतीक चक्रवर्ती म्हणतो, "त्यांच्या कथनाने आणि टिझर पोस्टरने मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. बंगाली सिनेमासाठी हा गेम चेंजर ठरू शकतो हे मला माहीत होतं.रुक्मिणी मैत्राने टीझर शूटसाठी ती व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी ज्या डेडिकेशनने काम केले आहे. त्यातून संपूर्ण युनिटच्या कार्यक्षमतेबद्दल बरेच काही सांगितले जाऊ शकते. भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्माते म्हणून आम्ही ६० गौरवशाली वर्षे पूर्ण केली असल्याने ज्यातून सर्जनशीलतेचे समाधान मिळेल आणि व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा जे चित्र आशादायी असेल. त्यांच्यासोबत एकत्र येण्याचा आम्ही विचार केला."
निर्मात्यांना अजून उर्वरित कलाकार आणि तंत्रज्ञ यांची अंतिम निवड करायची आहे. मात्र यातील प्रमुख कलाकार म्हणून गिरीश घोष, अमृतलाल, ज्योतिंद्रीनरथ, रामकृष्ण, कुमार बहादूर आणि रंगा बाबू हे कलाकार आहेत.