मनोरंजन

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला करायचे आहे प्रभासशी लग्न

Published by : Lokshahi News

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे प्रभास.'बाहुबली'या चित्रपटानंतर प्रभासची लोकप्रियता तुफान वाढली असून तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. आता एका बॉलिवूड अभिनेत्रीला प्रभासशी लग्न करायचे आहे. तिने एका मुलाखतीमध्ये ही इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या प्रभास 'आदिपुरुष'या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. नुकताच क्रितीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला प्रभासशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुलाखतीमध्ये प्रभास, टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन या तिन कलाकरांपैकी कोणासोबत फ्लर्ट करायला, डेट करायला आणि लग्न करायला आवडेल असा प्रश्न क्रितीला विचारण्यात आला. त्यावर क्रितीने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. मला कार्तिकसोबत फ्लर्ट करायला आवडेल, टायगरला डेट करेन आणि लग्न प्रभासशी करण्याची इच्छा आहे असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर ऐकून सर्वांना हसू अनावर झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...