Bollywood Celebs Corona Positive  Team Lokshahi
मनोरंजन

Bollywood Celebs Corona Positive : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण

बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) याने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टीचे आयोजन केले आहे. अनेक बॉलिवूडमधील कलाकार या पार्टीमध्ये उपस्थित होते. या पार्टीनंतर अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.

आता बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शाहरूख खानला लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा दिल्या आहे. तसेच शाहरूख खानचा मुलगा अबराम खानलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) पुन्हा एकदा कोरोना लागण झाली आहे. याआधीही म्हणजे 2021मध्ये कतरिना कोव्हिड पॉझिटिव्ह झाली होती. आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी विकी कौशलबरोबर कतरिना कैफही आबुधाबीला जाणार होती. परंतु ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ती 7 दिवस क्वारंटाईन होती. आता कतरिनाची कोरोना टेस्ट कोरोना नेगेटिव्ह आली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची (kartik aaryan) लागण झाली आहे. शुक्रवारी याबद्दलची माहिती त्याने त्याच्या ट्विटवरून ट्विट करून दिली आहे. त्याने आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स करणार होता.पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याचा आयफामधील डान्स रद्द करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही (Akshay Kumar) कोरोनाची लागण झाली होती. कान्स फेस्टिव्हल सुरू होण्याआधी अक्षयने याबद्दलची माहिती ट्विटद्वारे दिली होती. आता कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याने तो आता घरीचं होम क्वारंटाईन आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर