Rohit Shetty Team Lokshahi
मनोरंजन

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी; रूग्णालयात दाखल

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला कामिनेनी (Kamineni) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला कामिनेनी (Kamineni) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये 'इंडियन पोलीस फोर्स' (Indian Police Force) या अगामी सीरिजचे शूटिंग करताना हा अपघात घडला. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

'इंडियन पुलिस फोर्स' या अगामी वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा प्रमुख्य भूमिकेत असणार आहे. रोहित आणि सिद्धार्थ दोघेही या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करणार आहेत. या सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हे कलाकार प्रमुख्य भूमिकेत आहेत. 

रोहित शेट्टीच्या सिनेमांत सिनेप्रेमींना अॅक्शनचा तडका पाहायला मिळतो. 'सिंघम', 'दिलवाले' आणि 'सूर्यवंशी' असे अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतो. आणि सिनेप्रेमींचीही त्याला चांगली पसंती मिळताना पाहायला मिळते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा