Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : बॉलिवूडचा 'हा' कलाकार ठरला रणबीरसाठी प्रेरणास्थान....

रणबीर म्हणतो की माझे नायक जे काही सांगतात त्यांचा ड्रेसिंग सेन्स या सर्व गोष्टींपासून मला प्रेरणा मिळते.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या 'शमशेरा' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. रणबीरने चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तीन भागांची आर.के टेप आणली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये त्याने हिंदी सिनेमा आणि त्याच्यावरील प्रेमाविषयी सांगितले तर दुसरा एपिसोड यशराज फिल्म्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणबीर त्याच्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर एका ऑडिटोरियममध्ये बसलेला दिसत आहे. खुर्चीवर पाय ठेवून रणबीर अमिताभ बच्चन यांचे डायलॉग बोलताना दिसत आहे.

'तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहां इतजार कर रहा हूं'. या संवादाने रणबीर म्हणतो की लहानपणी मला अमिताभ बच्चन व्हायचे होते. मी लहान होतो तेव्हा मला शाहरुख खान आणि शेवटी रणबीर कपूर व्हावे लागले. माझे नायक जे काही सांगतात त्यांचा ड्रेसिंग सेन्स या सर्व गोष्टींपासून मला प्रेरणा मिळते. माझे वडील मला सांगायचे की तू चांगले चित्रपट करत आहेस परंतु ते तुला राष्ट्रीय स्तरावर स्टार बनवू शकत नाहीत. त्यानंतर माझे चित्रपट सुरू झाले आणि लोक मला पसंती देऊ लागले. रणबीर कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

'रॉकस्टार', 'संजू' हे त्यांच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपट ठरले आहेत. रणबीर कपूर शेवटचा 'संजू' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटानंतर रणबीर 'शमशेरा' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. त्याच्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रणबीरने आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'शमशेरा'मध्ये त्याची दुहेरी भूमिका दिसणार आहे. 'शमशेरा' या चित्रपटात रणबीर कपूर एका खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटात संजय दत्त(Sanjay Datt) 'शुद्ध सिंग' या निर्दयी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे वाणी कपूर 'शमशेरा'मध्ये डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'शमशेरा' 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानंतर रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू करणार असून त्यात तो आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?