Brahmastra Team Lokshahi
मनोरंजन

सोशल मीडियावर 'ब्रह्मास्त्र' विरोधात बायकॉट ट्रेंड सुरू; निर्मात्यांच्या चिंतेत वाढ...

आंदोलक काळे झेंडे घेऊन महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आणि चित्रपटाविरोधात गोंधळ घातला.

Published by : prashantpawar1

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही जोडी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनमध्ये पोहोचली होती. महाकालच्या दर्शनासाठी आलेल्या 'ब्रह्मास्त्र'च्या टीमला विरोधाला सामोरे जावे लागले. यावेळी आंदोलक काळे झेंडे घेऊन महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आणि चित्रपटाविरोधात गोंधळ घातला. स्थानिक पोलिसांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र यावेळी रणबीर, आलिया आणि अयान मुखर्जी (Ayan Mukherji) मंदिरात गेले होते की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

यादरम्यान काही व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत. ज्यामध्ये आंदोलक स्वत:ला बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगत चित्रपटाला विरोध करत आहेत. हा सर्व विरोध रणबीर कपूरच्या एका जुन्या वक्तव्यामुळे होत असल्याचं सांगण्यात येतय. या वक्तव्यात रणबीर कपूरने म्हटले होते की, त्याला बीफ आवडतं आणि तो बीफप्रेमी आहे. आता रणबीरच्या या जुन्या विधानाला प्रचंड प्रमाणात विरोध केला जात आहे.

1. सोशल मीडियावर चित्रपटाचा निषेध

बहिष्काराचा ट्रेंड आता हळूहळू ब्रह्मास्त्राला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या चित्रपटाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्याबद्दलची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत निदर्शने सुरू झाली असून चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. ट्विटरवर बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंड सुरू झाला आहे. चित्रपटाबाबत सुरू झालेल्या या विरोधामुळे निर्मात्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

2. हा चित्रपट अयान मुखर्जीसाठी विशेष

'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीसाठी खास चित्रपट आहे. 2012 मध्ये जेव्हा दिग्दर्शक अयान मुखर्जी बर्फाळ पर्वतांमध्ये 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. तेव्हा या चित्रपटाची कल्पना त्यांच्या मनात आली होती. अयानने या प्रोजेक्ट्साठी जवळपास एक दशकापासून स्वतःची गुंतवणूक केलेली आहे. आणि ही केवळ तीन चित्रपटांची मालिका आहे ज्याचा पहिला भाग रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच देशातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचं सांगितलं जातं आहे. हा चित्रपट जवळपास 8000 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या महत्त्वाकांक्षी चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, मौनी रॉय आणि शाहरुख खान या कलाकार मंडळींच्या विशेष भूमिका आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 'एकदंत' का म्हणतात ? जाणून घ्या यामागच्या रोचक कथा

Ganesh Chaturthi 2025 : गणेशपूजेत दुर्वा अर्पणाची योग्य पद्धत; जाणून घ्या धार्मिक महत्व

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या सजावटीची तयार नाही झाली, मार्केट शोधताय, तर मग 'या' ठिकाणी करा बाप्पाच्या साहित्याची खरेदी

Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन