Brahmastra
Brahmastra Team Lokshahi
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र' झाला लिक ; निर्मात्यांच्या चिंतेत वाढ....

Published by : prashantpawar1

बॉलीवूडच्या मेगा बजेट चित्रपटांपैकी एक असणारा 'ब्रह्मास्त्र' आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी देशभरातील आणि परदेशातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आगाऊ बुकिंगमुळे पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले. 'ब्रह्मास्त्र तिकिट'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन अद्याप समोर आले नसले तरी निर्मात्यांना याचा मोठा झटका बसला आहे. असे सांगितले जात आहे की रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' काही वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला असून लोक उच्च गुणवत्तेत चित्रपट विनामूल्य डाउनलोड करत आहेत. चित्रपट लीक झाल्यामुळे त्याच्या कलेक्शनवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड क्रेझ आहे. रणबीर कपूरच्या जुन्या वक्तव्यामुळे चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असली तरी. दरम्यान 'ब्रह्मास्त्र' इंटरनेटवर लीक झाल्याच्या बातमीने निर्मात्यांची चिंतेत वाढ झाली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपट लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' एपिसोड 1 आणि एपिसोड 2 देखील पायरसी वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला होता. नुकतेच प्रदर्शित झालेले 'लिगर', 'लाल सिंग चड्ढा', 'रक्षा बंधन', 'दोबारा', 'आरआरआर', 'पुष्पा' आणि इतर मोठे सिनेमेही या कुप्रसिद्ध वेबसाइट्सनी लीक केले होते.

काही वर्षांपूर्वी यासाइटवर अनेक कठोर कारवाई करण्यात आल्या आहेत. परंतु असे आढळून आले आहे की साइटच्या मागे असलेली टीम प्रत्येक वेळी विद्यमान TamilRockers साइट ब्लॉक करते तेव्हा नवीन डोमेनसह दिसते. त्यांच्यावर बंदी घातल्यास ते नवीन डोमेन घेतात. आणि चित्रपटांच्या पायरेटेड आवृत्त्या ऑनलाइन लीक करतात. Torrent आणि 'TamilRockers' त्यांच्या रिलीजच्या काही तासांत चित्रपट लीक करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. या वेबसाईट्सवर 'ब्रह्मास्त्र'ही लीक झाले आहे.

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात