मनोरंजन

'गंगूबाई काठियावाडी'ची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद; ब्रिटिश फिल्म आर्काइव्हने केले आलियाचे केले कौतुक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट रिलीज झाल्यावर दर्शकांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, हा सिनेमा मागील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये सर्वाधिक आवडत्या चित्रपटांपैकी एक ठरला असून फक्त भारतातच नव्हे तर परदेशात देखील या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अशातच, आजही या चित्रपटाला जगभरातील सर्व मान्यवरांकडून दाद मिळत आहे.

यावेळी, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट नॅशनल आर्काइव्हचे मुख्य क्युरेटर रॉबिन बेकर यांनी सोशल मीडियावर 'गंगूबाई काठियावाडी'चे कौतुक केले. यासोबतच त्यांनी बाफ्टा आणि अकादमी पुरस्कारांनाही हा चित्रपट पाहण्याची विनंती करत लिहिले, “मी जर बाफ्टा किंवा अकादमीचा सदस्य असतो, तर 'गंगूबाई काठियावाडी'मधील अभिनयासाठी मी यावर्षी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मत देईन. ती एक प्रॉस्टि्यूटपासून अंडरवर्ल्ड वेश्यालयमध्ये बदलते. तसेच जी लैंगिक कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवते.

हा चित्रपट मोठा, चपखल, सेंटीमेंटल आणि आनंददायी असून यात आलिया भट्ट सेनसेशनल आहे. सिनेमातील क्लासिक हिंदी सिनेमा रिफरेंस चित्रपटाचे आकर्षण वाढवतात. गंगूबाईचे देव आनंद यांच्यावरील प्रेमापासून ते 50 आणि 60च्या दशकातील सिनेमाच्या सीन्स, ते बॉम्बेच्या रेड लाईट डिस्ट्रिक्टच्या आसपासच्या रस्त्यावरील असंख्य चित्रपट पोस्टर्सपर्यंत. अशातच, तुम्ही ते पाहिले नसेल, तर नेटफ्लिक्स वर लवकरात लवकर जा, अशी विनंती बेकर यांनी केली आहे.

तसेच, संजय लीला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा महामारीनंतर प्रदर्शित झालेला पहिला हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटासह, दिग्दर्शकाने जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवत, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. कमर्शियल सक्सेस ठरला. हा सिनेमा महामारीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी पहिला हिट ठरला, ज्याने देशात ₹153.69 कोटी आणि जागतिक स्तरावर ₹209.77 कोटींची कमाई केली.

खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाले; "कोल्हापूरमध्ये महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी..."

Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी

Sanjay Shirsat on Chandrakant Khaire: 'तो' व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्लाबोल