Manva Naik  Team Lokshahi
मनोरंजन

मनवा नाईकसोबत कॅब चालकाचे गैरवर्तन, पोस्टवर कंमेंट करत पोलिस सहआयुक्त यांनी दिली कारवाईची ग्वाही

प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक हिच्यासोबत उबेर कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिली कारवाई करण्याची ग्वाही

Published by : Sagar Pradhan

राज्यात महिला असुरक्षित असल्याचा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. अशातच अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शिका मनवा नाईक हिच्याशी मुंबईत एका उबर कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर कॅब चालकाने तिला धमकीही दिल्याचे तिने सांगितले. तिने हा सगळा प्रसंग फेसबुकवर पोस्ट करून लिहिली आहे. मनवाच्या पोस्टवर स्वतः पोलिस सहआयुक्त मुंबई विश्वास नांगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

मनवाची फेसबुक पोस्ट

अभिनेत्रीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी रात्री 8.15 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधून उबेर टॅक्सी घेतली. बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे उबर चालकाने फोनवर बोलणे सुरू केले. ज्यावर मी आक्षेप घेतला. यानंतर बीकेसी सिग्नलही तोडला.  सिग्नल तोडल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कॅब चालकाला थांबवून कॅबचा फोटो काढला. त्यावर कॅब चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असं मी पोलिसांना सांगितलं. पण त्या उबर चालकाला राग अनावर झाला होता.  तू 500 रुपये भरणार आहेस का? असं त्याने मला संतापून विचारलं.   तू फोनवर बोलत होतास असं मी त्याला म्हणाले. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि  मला धमकावणं सुरू केलं. थांब तुला दाखवतोच, अशा शब्दांत त्याने मला धमकावलं.

मी त्याला गाडी पोलीस स्टेशनला घे, असं सांगितलं. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.  मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितले. संपूर्ण प्रवासात त्याने माझ्याशी वाद घातला. गाडी भरधाव वेगाने चालवत असतानाव वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. काय करणार? थांब दाखवतोच आता, अशी धमकी त्याने मला दिली.

त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाºयासोबत फोनवर बोलत असतानाही तो भरधाव  गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती.   मी त्याला गाडी थांबव, असं सांगूनही त्याने माझं ऐकलं नाही. त्याने कोणाला तरी फोन केला. ते पाहून मी जोरजोरात ओरडू लागले. दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढलं. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे मी घाबरले आहे, असा संपूर्ण प्रसंग तिने फेसबुकवर शेअर केला आहे.

मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे यांची प्रतिक्रिया

मानवा जी, आम्ही या गंभीर घटनेची गंभीर दखल घेतली आहे! Dcp झोन 8 यावर काम करत आहे आणि दोषींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करेल. अशी कमेंट सहआयुक्त नांगरे पाटील यांनी मनवाच्या पोस्टवर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?