Shilpa Shetty - Raj Kundra 
मनोरंजन

Shilpa Shetty - Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, कारण काय?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Published by : Team Lokshahi

(Shilpa Shetty - Raj Kundra ) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार दीपक कोठारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये राजेश आर्या यांच्या माध्यमातून त्यांची शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख झाली. त्या काळात कुंद्रा आणि शेट्टी हे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या होम शॉपिंग आणि ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीचे संचालक होते. या कंपनीने कोठारी यांच्याकडून 75 कोटी रुपये 12% व्याजदराने घेतल्याचे सांगितले. मात्र, व्याज टाळण्यासाठी त्यांनी ती रक्कम कंपनीत गुंतवणुकीच्या स्वरूपात दाखवल्याचा आरोप आहे.

कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, ठरल्याप्रमाणे मासिक हप्त्यांद्वारे मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण ते पाळले गेले नाही. 2016 च्या सप्टेंबरमध्ये शिल्पा शेट्टीने संचालक पदाचा राजीनामा दिला. तरीही, 2015 ते 2023 दरम्यान "व्यवसाय वाढवून पैसे परत करू" अशी हमी देण्यात आली, परंतु ती पूर्ण झाली नाही. सध्या संबंधित कंपनी बंद झाली असून, गुन्हा जुहू पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून, पुढील कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा