मनोरंजन

गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संतोष आवारे | अहमदनगर : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगरमधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे नृत्यांगना पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल कार्यक्रम घेणे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डीजे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादंवि कलम १८८, २८३, ३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम २, १५ व ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० चे कलम ३, ४, ५, ६, मु.पो.का.क ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा