MBCCL Team l;okshahi
मनोरंजन

Celebrity Cricket | मराठी सिनेसृष्टीचे कलाकार क्रिकेटच्या मैदानात उतरणार

अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे.

Published by : Team Lokshahi

प्रत्येकाला क्रिकेटची आवड असते. क्रिकेट म्हटलं की सगळ्याचा उत्साह जागा होतो. मग आपले सिनेसृष्टीचे कलाकार कसे मागे राहतील. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार क्रिकेटचे शौकीन आहेत. पण शुटिंग, वेळेची कमतरता यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळत नाही. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (marathi box celebrity cricket league) (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे. ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

लोगोचे अनावरण झाले असून एमबीसीसीएलमध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत. ही एक खरी क्रिकेटची मॅच असून यात काही संघ असतील. तर या खेळामध्ये पुरुषासोबत महिला कलाकार देखील सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून महाराष्ट्रातील विविध प्रसिध्द शहराचे नाव प्रत्येक संघाला दिले जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा