मराठी साहित्यातील क्रांतिकारी कवी आणि दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्यासह साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जुलै 2024 पासून निर्माते सेन्सॉर बोर्डाच्या दारात चकरा मारत असूनही, बोर्डाने चित्रपटातील ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत नोटीस बजावली आहे.‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट ढसाळ यांच्या चळवळीतील योगदान आणि त्यांच्या कवितांवर आधारित आहे. सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या कवितांतील प्रखरता आणि सामाजिक संदेश खटकले आहेत. या कविता काढल्याशिवाय चित्रपटाला परवानगी मिळणार नाही, असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे.
नामदेव ढसाळ कोण होते?
नामदेव ढसाळ (15 फेब्रुवारी 1949 - 15 जानेवारी 2014) हे मराठी साहित्यातील एक थोर कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पूर गावात जन्मलेल्या ढसाळ यांनी मुंबईच्या गोलपीठा परिसरातील कठोर जीवनातून प्रेरणा घेत ‘गोलपीठा’ (1973) हा पहिला कवितासंग्रह लिहिला. या संग्रहाने त्यांना साहित्यविश्वात खळबळ माजवली. त्यांच्या विद्रोही कवितांनी दलितांचे दुःख आणि व्यवस्थेविरुद्धचा राग प्रभावीपणे मांडला.
चित्रपटावर का आहे वाद?
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट ढसाळ यांच्या चळवळीतील योगदान आणि त्यांच्या कवितांवर आधारित आहे. सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या कवितांतील प्रखरता आणि सामाजिक संदेश खटकले आहेत. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या कविता काढल्याशिवाय चित्रपटाला परवानगी मिळणार नाही. यावर निर्माते महेश बनसोडे म्हणाले, “नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे.