The Kapil Sharma Show Team Lokshahi
मनोरंजन

कृष्णा आणि भारती सिंह पाठोपाठ 'या' कलाकाराने सोडलं 'द कपिल शर्मा शो'

प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आणि खळखळून हसवणारा लोकप्रिय शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'द कपिल शर्मा शो' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Published by : shamal ghanekar

प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आणि खळखळून हसवणारा लोकप्रिय शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'द कपिल शर्मा शो' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता 'द कपिल शर्मा शो'चे नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'द कपिल शर्मा शो'संबंधित काही नवीन माहिती समोर येत आहे. 'द कपिल शर्मा शो' शोमधून आणखी एका कलाकाराची एक्झिट झाल्याची माहिती समोर येत आहे.

10 सप्टेंबरपासून 'द कपिल शर्मा शो' शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी कपिल शर्मा नव्या कॉमेडियनसोबत आपला शो सुरू करणार आहे. या शोमध्ये अनेक नवे आणि जुने चेहरेही पाहायला मिळणार आहेत. तसेच यावेळी कपिलचा मित्र चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar ) म्हणजेच चंदूही 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार नसल्याच्या स्वत: याविषयी माहिती दिली. कपिल आणि चंदनमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण नसल्याचे चंदनने स्पष्ट केलं आहे. त्याला फक्त यातून ब्रेक हवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'द कपिल शर्मा शो' सुरू होण्यासाठी अवघ्ये तीन दिवस बाकी असताना शोमधून धक्कादायक बातमी समोर येत आहेत. कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंहनंतर (Bharati Sinha)आता चंदन प्रभाकर हा शोला सोडत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा