'शूटर दादी' नावाने सुप्रसिद्ध असलेल्या नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर चंद्रो तोमर यांच्यावर मेरठमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
२६ एप्रिल रोजी चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आले होते. त्यांना बागपतच्या आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारासाठी गुरुवारी त्यांना मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर चंद्रो तोमर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली होती.
चंद्रो तोमर यांच्या आयुष्यावर आधारीत 'सांड की आँख' नावाच्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या सिनेमात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांनी भूमिका साकारली होती.