मनोरंजन

‘फास’ चित्रपटातील गाण्यात घुमणार छत्रपतींचा जयघोष

Published by : Lokshahi News

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारसरणीचा महाराष्ट्रातील प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धनीतीच्या अभ्यासक्रमात आजही ज्यांची रणनीती अभ्यासली जाते. छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसांच्या हृदयात कायमचे अजरामर झाले आहेत. 'फास' या आगामी सामाजिक मराठी चित्रपटातही शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारं गीत गायले गेलं आहे.

माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकत समाजातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'फास'ची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे.


'फास' या चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश कोलते यांनी केली असून उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे यांच्या भूमिका आहेत या चित्रपटाची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं आहे.


जगभरातील परीक्षक आणि जाणकार रसिकांची कौतुकाची थाप मिळवत १३० पेक्षा अधिक पुरस्कार पटकावणारा 'फास' ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शेतकरी आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा ठरणार आहे. सातत्यानं वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणाऱ्या परिणामावर आधारलेली कथा 'फास'मध्ये पहायला मिळणार आहे.

कानसह जापान आणि पॅरिस या परदेशांसोबतच राजस्थान व नोएडा या महत्त्वाच्या शहरांमधील सिनेमहोत्सवांमध्ये 'फास'चं खूप कौतुक करण्यात आलं आहे. रमणी रंजन दास या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत, तर अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे हे संकलक आहेत. कला दिग्दर्शनाची बाजू संतोष समुद्रे यांनी सांभाळली आहे.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य